Home »News

लॉकडाऊन दरम्यानच्या काळामधील वाहनाच्या दस्ताऐवजांची वैधता

                                                                                    पणजी,

15 एप्रिल 2020

गोवा सरकारने कोव्हीड-19 च्या या वैश्वीक महामारीमध्ये अत्यावश्यक वस्तू आणि उत्पादने प्रदान केली आहे आणि त्या अत्यावश्यक वस्तू वाहनांद्वारे पोचविण्यासाठीची अनुमती दिलेली आहे. गोवा सरकारच्या असे लक्षात आले आहे की लॉकडाऊनमुळे सकारी वाहतूक खाते बंद असल्याने गोमंतकातल्या नागरिकांना वाहतूकीच्या संदर्भातील विविध दस्ताऐवजांच्या वैधतेच्या नूतनीकरण करण्याबाबत अडचणी उद्भवत आहे.  जे मोटर वाहतूक अधिनयम, 1988 आणि केंद्रिय मोटर वाहतूक नियम,1989 यांच्याशी संबंधित आहेत.

या संदर्भात, मोटर वाहन अधिनियम, 1988 आणि केंद्रिय मोटर वाहन नियम,1989 च्या अंतर्गत दस्ताऐवजांच्या नूतनीकरणाच्या आवश्यकता लक्षात घेता वैधतेबाबत सर्व प्रकारची पर्मिट केलेली वाहने, वाहतूक परवाना, नोंदणीकरण किंवा वाहतूक संबंधित दस्ताऐवज यांचे नुतनीकरणाची प्रक्रिया पुर्ण झालेली नसल्यास आणि त्यांची वैधता ही दिनांक 1 फ्रेबुवारी 2020 संपली असल्यास किंवा 30 जून 2020 पर्यंत संपत आली असल्यास तर या सर्व बाबींना 30 जून 2020 पर्यंत वैध ठरविले जाईल असा सल्ला देण्यात आला आहे.

परिवहन वाहनांसाठी नॉन-युस्ड क्लॉस फेसिलिटीज्याद्वारे कर लायेबिलीटी निलबिंत केले जाते, जे अन्य राज्यांमध्येही कार्यरत आहे आणि जी व्हीएएचएएनच्या ऑनलाईन व्यासपीठावर ही सुविधा एनआयसी प्रदान करते. व्यावसायिक वाहने जसे टॅक्सी, बस इत्यादी जी सद्य परिस्थितींमध्ये कार्य करू शकत नाही त्यांना दिलासा देण्यासाठी अन्य राज्ये ही कार्यपध्दती अंगिकारू शकते.

डीआय/एनबी/जेए/एसजीएन/सी/आर/एनएसएस/2020/1858

TOP