Home »News

राष्ट्रीय अग्नीशमन सेवा दिवस साजरा

 

पणजी, १४ एप्रिल २०२०

 

सेवा बजावताना कामी आलेल्या अग्निशमन जवानांना मुख्य सचिव श्री परिमल राय, आयएएस, यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा खात्याने राष्ट्रीय अग्नीशमन सेवा दिवस साजरा करण्यासाठी कांपाल, पणजी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

याप्रसंगी, अग्नी सुरक्षा शिक्षण व्हॅनवर शैक्षणिक सिनेमा दाखवण्यात आले. कोरोना-१९ च्या फैलावाला आळा घालण्यासाठी शहरांतील आणि मुख्य मार्गावरील इमारतींमधील लोकांना शिक्षण देण्यासाठी जागृती मोहीम उघडणार असल्याची माहिती स्टेशन अग्निशमन अधिकारी श्री रवी नाईक यांनी दिली.

संचालक श्री अशोक मेनन यांनी पाहुण्यांचे स्वागत केले

उप-संचालक श्री. नितीन रायकर, प्रशासन उप-संचालक श्रीमती बेगम लोबो,  अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा खात्याचे सर्व कर्मचारी आणि इतर यावेळी उपस्थित होते.

DI/NB/JA/SGN/NP/NSS/2020/1848

TOP