Home »News

धार्मिक सभा, सामाजिक / सांस्कृतिक / धार्मिक कार्यक्रमांवर सरकारची बंदी

 

पणजी: १० एप्रिल २०२०

 

भारत सरकारच्या गृहसचिवांनी सर्व सामाजिक / सांस्कृतिक / धार्मिक कार्यक्रम / मेळावे याबरोबरच सर्व धार्मिक सभांना परवानगी देण्यास बंदी घातली आहे व एप्रिल २०२० महिन्यात येणार्‍या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही सामाजिक / धार्मिक मेळाव्याला / मिरवणुकीला परवानगी न देता लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन करण्याची विनंती राज्य सरकारला केली आहे. 

देशातील कोविड -१९ जागतिक महामारीच्या नियंत्रणासाठी लॉकडाउन उपाययोजना संदर्भात गृह व्यवहार मंत्रालयाने, दि. २४ मार्च २०२० रोजी अधिसूचित केलेल्या एकत्रित मार्गदर्शक तत्त्वांच्या कलम ९ आणि १० वर लक्ष वेधले आहे जी पुढे २५ मार्च २०२०,         २७ मार्च २०२०, ०२ एप्रिल २०२० आणि ०३ एप्रिल २०२० रोजी सुधारित केलेली आहेत.

जिल्हा अधिकारी आणि फील्ड एजन्सींनी कायदा व सुव्यवस्था, शांतता व सार्वजनिक शांतता राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व सावधगिरी / प्रतिबंधात्मक उपाययोजना घेण्याबरोबरच सोशल मीडियावर प्रसारित होणार्‍या आक्षेपार्ह मजकूराबाबत योग्य दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.

कोणत्याही लॉकडाऊन उपाययोजनांचे उल्लंघन किंवा भंग केल्यास कायदा अंमलबजावणी यंत्रणांतर्फे आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ आणि आयपीसीच्या संबंधित दंडात्मक तरतुदींनुसार कारवाई केली जाईल.

 TOP