Home »News

एस सीने कोविड-१९ परिस्थितीचा आढावा घेतला.

पणजी, १० एप्रिल २०२०.

मुख्य सचिव श्री परिमल राय यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारी समितीची बैठक बुधवार दिनांक ८ एप्रिल २०२० रोजी झाली. या बैठकीस श्री. पुनित कुमार गोयल, प्रधान सचिव, विज्ञान व तंत्रज्ञान, श्री.एस के भंडारी, सचिव,परिवहन आणि श्री संजय कुमार, सचिव महसूल,सदस्य सचिव, एसईसी आणि एसडीएमए उपस्थित होते.

श्री. दौलत हवालदार, सचिव, वित्त, श्री. सुभाष चंद्र, पीसीसीएफ, श्री. कुणाल, सीईओ, श्री.राजेश कुमार, डीआयजी, श्रीमती. निला मोहनन, सचिव, आरोग्य, श्री. अमित सतेजा, कमिशनर, अबकर, श्री. पी.एस. रेड्डी, सचिव, मत्स्य, श्री. जे. अशोक, सचिव, पर्यटन, श्री. संजय गरिहर, सचिव, पंचायत, श्री. सी. आर. गर्ग, सचिव, कायदा, इशा खोसला, सचिव, नागरी पुरवठा, श्री. यू. पी पार्सेकर, प्रधान मुख्य अभियंता, पीडब्लूडी आणि आर. जी. केणी, मुख्य अभयंता, वीज यांची सुध्दा खास आमंत्रित म्हणून ह्या सभेस उपस्थिती होती.

सचिव, आरोग्य यांनी एसईसीच्या विचारविनिमयदरम्यान सांगितले की नियोजित घर-घर सर्वेक्षण करण्या करिता मास्टर ट्रेनर आणि इन्सीडंट कमांडर्सना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पायलट सर्वेक्षण करण्यासाठी काही संघांना काही भागात पाठविण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले.

मास्क उपलब्धतेवर विचारविनिमय करताना एसईसीने मास्क योग्य दरात उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला. आंतरराज्य ये-जा करण्यासाठी रेल्वेमार्गाचा वापर कोणीही करू नये यासाठी यंत्रणा बसविण्याचा निर्देशही डीआयजीला देण्यात आला.

श्री. पी एस रेड्डी, सचिव, मत्स्य यांनी एसईसीला माहिती दिली की क्वारेंटाईन सुविधा निकषांनुसार कार्यरत आहेत.

 १९१ पैकी १६४ पंचायतींनी मान्सूनपूर्व काम सुरू केले असून महापालिका क्षेत्रातही अशीच कामे हाती घेण्यात आल्याची माहिती पंचायत संचालकांनी दिली.

लॅाकडाऊन संपल्याानंतर राष्ट्रीय व राज्य महामार्गासाठी आवश्यक देखबाल व दुरूस्तीची कामे करण्यास एसईसीने पीसीईला सांगितले.

लॅाकडाऊन कालावधी दरम्यान एसईसीने जिल्हा निरीक्षकांना सतर्क राहण्यास सांगितले आणि प्रभावी लॅाकडाऊन सुनिच्छित करण्याची गरज ह्या विषयावर भर दिला.

TOP