Home »News

व्हिशिंग फ्रॉडवरगोवा पोलिसांच्या सायबर सेलद्वारे सावधानता

१० एप्रिल २०२०

सद्या चालू असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर व्हिशिंग फ्रॉडचा नवीन मोड्युस ऑपरेंडी तयार केला आहे असे नजरेस आले आहे जेथे लोकांना फोन कोल्स करून त्यांचे ईएमआय पुढे ढकलण्याच्या बहाण्याने त्यांच्या डेबिट / क्रेडिट कार्डची माहिती, पिन आणि ओटीपी प्राप्त केले जातो.

व्हिशिंग फ्रॉड म्हणजे फसवणूक ज्यात प्रतिष्ठित कंपन्या किंवा विशेषतः कोणत्याही बँक्स किंवा कोणत्याही वित्तीय संस्थां असे सांगून किंवा दाखवून एखाद्या व्यक्तीला डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड  इत्यादींसारखी गोपनीय माहिती उघड करण्यासाठी  फोन कॉल किंवा व्हॉईस मेसेजेस केला जातो.

अशा फसवणूकीतून स्वतःला वाचविण्यासाठी घेतलेले पाऊल म्हणजे गोवा पोलिसांनी कोणालाही कार्डची माहिती, बँकेची माहिती, पिन किंवा ओटीपी सांगू नये असा सल्ला दिला आहे.

 

TOP