Home »News

कोविड-१९ ची गोव्यातील स्थिती

०८ एप्रिल २०२०

प्रसार माध्यमातून आरोग्य विभागाने गोवा राज्यातील कोविड-१९ च्या स्थितीची दिलेली माहिती खालीलप्रमाणे- ०८ एप्रिल २०२० पर्यंत घरी निगराणीत असलेले (होम कॉरंटाईन)  प्रवासी रुग्ण ४७, २९ जानेवारी २०२० पासून एकंदरित रुग्णांची संख्या १३२७. तसेच, ०८ एप्रिल २०२० पर्यंत सुविधा निगराणी अंतर्गत संपर्कात आलेल्या रुग्णांची संख्या शून्य, तर २९ जानेवारी २०२० पासून एकंदरित रुग्णांची संख्या १९८. ०८ एप्रिल २०२० पर्यंत, हॉस्पिटल विलगीकरण (हॉस्पिटल आयजोलेशन) अंतर्गत संशयित रुग्ण ०४, तर २९ जानेवारी पासून एकंदरित रुग्णांची संख्या १२९. ०८ एप्रिल २०२० पर्यंत चाचणीसाठी पाठविण्यात आलेले नमुने ११, तर २९ जानेवारी २०२० पासून एकंदरित रुग्णांची संख्या ३३१. प्राप्त झालेले अहवाल (रिपोर्ट्स) ४७ आणि २९ जानेवारी पासून एकंदरित रुग्णांची संख्या ३२४. ०८ एप्रिल २०२० पर्यंत, नमुन्यांची चाचणी केलेल्यांपैकी एकही पोझिटीव्ह नाही तर २९ जानेवारी २०२० पासून एकंदरित रुग्णांची संख्या ०७ आहे. 

     पुढे असे कळविण्यात आले आहे की, प्रलंबित ५८ नमुन्यांपैकी ४७ नमुन्यांचा अहवाल नॅगेटीव्ह आला आहे तर उर्वरीत ११ नमुन्यांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. सद्या, गोमेकॉच्या विलगीकरण वॉर्डमध्ये (आयजोलेशन वॉर्ड) १२ रुग्ण आहेत. ईएसआय हॉस्पिटल मडगाव येथे ०५ पोझिटीव्ह रुग्ण आहेत. चिखली एसडीएमध्ये संशयित विलगीकरणात (आयजोलेटेड) असलेला ०१ रुग्ण आहे. फोंड्यातील एसडीएचमध्ये संशयित विलगीकरणात (आयजोलेटेड) असलेला रुग्ण ०१. ओल्ड गोवा रॅझिडेन्सीमध्ये संपर्क निगराणीत असलेले रुग्ण ०३. मडगाव रॅझिडेन्सीमध्ये संपर्क निगराणीत असलेले रुग्ण ०९ आहेत.

 

डीआय/एनबी/पीएन/डीएसके/एनएसएस/2020/1789

TOP