Home »News

नगर विकास विभागाने केलेली कोविड-१९ ची तयारी

०८, एप्रिल २०२०

पंतप्रधानांनी दि. २२ मार्च २०२० रोजी होणार्‍या सामाजिक अंतर / जनता कर्फ्यूसंदर्भात केलेल्या आवाहनानुसार शहरी स्थानिक संस्थांमार्फत फेसमास्क, हात धुण्याची सुविधा,  स्वच्छता सेवा यासारखे संरक्षणाचे उपाय पुरवून नगर विकास विभागाने दि. २२ मार्च, २०२० रोजी सकाळी ७.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत व्यापार स्थापना, मार्केट स्ट्रीट विक्रेते, फेरीवाले बंद राहतील याची सूचना जारी केली होती. बाजारात गर्दी टाळण्यासाठी बाजार संघटनेशी उपयुक्त उपाययोजनांचा अवलंब करण्यासाठी चर्चा करावी असाही सल्ला शहरी स्थानिक संस्थांना देण्यात आला. २२ मार्च २०२० नंतर साप्ताहिक बाजारपेठ वगळता उर्वरीत बाजारपेठ खुले राहील.

शहरी स्थानिक संस्थांना कोविड-१९ या विश्वमारीविरुध्द लढण्यासाठी जे आरोग्य कर्मचारी निष्काळजीपणाने सेवा करत आहेत त्यांचे आभार मानण्यासाठी संध्याकाळी ५.०० वाजता भोंगा वाजविण्याचा सल्ला दिला होता. स्वच्छता सेवा आणि फेस मास्क, हात धुण्याची सुविधा इत्यादींसारख्या संरक्षण उपाययोजनांची काळजी घेण्याचाही आदेश देण्यात आला होता. गोवा राज्यात जनता कर्फ्यू तीन दिवस वाढल्यानंतर स्वच्छता कामगारांचीसुध्दा सोय केली.

तसेच, देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर शहरी स्थानिक संस्थांना मानक संक्रमण प्रतिबंध नियंत्रण पद्धती दिल्या आणि विलगीकरण (कॉरेन्टाईन) लोकांच्या घरांमधल्या कचर्‍याची सुरक्षितरित्या विल्हेवाट करण्याचा अतिरिक्त सल्लाही दिला. म्हणूनच, महानगरपालिकेतील कामगारांना कोविड-१९ च्या उपाययोजना हाती घेताना संभाव्य व्यावसायिक प्रदर्शनास सामोरे जावे लागले असे जारी केले. व्यावसायिक ठिकाणी, पूजास्थळे, लोकप्रिय पर्यटन स्थळे, बागा यासारखी सार्वजनिक ठिकाणी पुन्हा उघडण्याआधी ती विशेष साफसफाईने म्हणजेच झाडून, ब्लीचिंग, निर्जंतुकीकरण आणि पूर्ण सॅनिटाईज केली आहेत.

ज्या घरातील लोकांना विलगीकरण (कॉरेनटाईन) केलेले आहे त्यांना शहरी स्थानिक संस्थांनी विशिष्ट अशा पिवळ्या आणि नारंगी रंगाच्या कचर्‍यांच्या पिशव्या द्याव्यात आणि विलगीकरण (कॉरेनटाईन) असलेल्या लोकांच्या घरातील कचर्‍याला बायोमॅडिकल कचरा म्हणून संबोधण्यात येईल. मास्क आणि विलगीकरण (कॉरेनटाईन) नसलेल्या लोकांच्या घरातील कचर्‍याची सुरक्षितरित्या विल्हेवाट लावणे आणि कोविड-19 चा कचरा एकत्र करून त्याचे वाहतुकीकरण करणार्‍या स्वच्छता कामगारांचे हित करणे. समाजात जागृती आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शहरी स्थानिक संस्थांना जिल्हा प्राधिकारणीच्या बरोबरीत काम करण्यास सांगितले आहे. ज्याद्वारे प्रत्यक्ष काम करणार्‍यांना काय करावे व काय करू नये याबाबत तसेच  कोविड-19 संबंधित नियमावलीचा प्रसार आणि नागरिकांना जागृतीचा संदेश दिला जाईल. 

म्हापसा येथील आस्था या बिगर सरकारी संस्थेने नगरातील बेघरांना फुड पॅकेटस वितरीत केल्याची दखल नगरी विकास खात्याने घेतली आहे. आजच्या तारखेपर्यंत गोवा पोलीस खात्याच्या सहकार्याने त्यांनी 3800 फुड पॅकेटसचे वितरण केले आहे. करारबध्द मान्यतेप्रमाणे सर्व शहरी स्थानिक संस्थांना येत्या पावसाळ्यात होणार्‍या पुरसदृश्य स्थितीवर प्रतिबंध घालण्यासाठी संबंधित कार्यक्षेत्रांमध्ये नगरपालिका ड्रेन गटरांच्या कामासाठी कामगार नियुक्त केले आहेत. यासाठी रू.1.43 कोटींचा निधी मंजूर केला आहे.

लॉकडाऊनचा काळ संपेपर्यंत सॅनिटायजेशनच्या कामाची अंमलबजावणी योग्यरित्या होत असल्याची जबाबदारी घेण्यासाठी देखरेख समिती स्थापन केली आहे तसेच कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी 10 ग्रेड औद्दोगिक सोडियम हायपोक्लोराईड द्रव्याचा वापर सार्वजनिक शौचालये आणि सार्वजनिक ठिकाणी केला जाईल. मनुष्यबळ तसेच यंत्राचा वापर करून फवारणी केली जाईल.एनयुएलएमच्या अंतर्गत स्वयं सहाय्य गटांना 2500 जे डबल्यूएचओ दर्जाप्रमाणे 100 टक्के कॉटन दुपट्टी मास्क शिवण्यासाठी नियुक्त केले आहे. स्वच्छता कामगारांना आणि अन्य नगरपालिका कर्मचार्‍यांना त्यांचा पुरवठा केला जाईल. नियमावलीप्रमाणे विलगीकरण (कॉरेनटाईन) केलेल्या घराच्या कचर्‍यासाठी पिवळ्या रंगाच्या पिशव्यांचा पुरवठा केला जाईल.

 

डीआय/एनबी/पीएसएन/डीके/पीएन/2020/1815

 

TOP