Home »News

वीज खात्याने वीज बिल भरण्याची देय तारीख पुढे ढकलली

 

पणजी- ७ एप्रील २०२०

वीज खाते, गोवा सरकारने कोव्हीड-१९ वर नियंत्रण ठेवण्यासाठी गोवा राज्यात सुरू असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमिवर आजपर्यंतची तयार वीज बिले आणि ग्राहकांना देण्यात आलेली बिले भरण्याची देय तारीख ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्या ग्राहकांना वीज बिल देण्यात आले आहे त्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी:- एच टी ग्राहकांसाठी एप्रिल,२०२० मध्ये तयार करून जारी केलेल्या वीज बिलांच्या देय तारखेची मुदत १५ मे,२०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे, एलटी ग्राहकांना देण्यात आलेल्या वीज बिलांची देय तारीख ज्यांच्या सध्याच्या तारखा लॉक डाउनच्या कालावधित येतात त्याची मुदत २० मे २०२० पर्यंत वाढवली आहे. मुदतवाढ काळात देय वीज बिल भरल्यास ग्राहकांच्या वीज बिलांच्या न भरलेल्या रकमेवर कोणताही विलंब देय शुल्क (डीपीसी) आकारला जाणार नाही.

 

डीआय/एनबी/जेए/पीपी/जीडी/२०२०/१८१४

 

 

TOP