Home »News

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पूर्वपदावर

पणजी, 6 एप्रील 2020

चैत्र 17, 2020

सर्व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा आता पूर्ववत सुरू झाला आहे. त्याचप्रमाणे 4थी ग्रोसरीज-ऑन-व्हील गाडीही सुरू झाली आहे. दोन ग्रोसरीज-ऑन-व्हील गाड्या  प्रत्येक जिल्हाधिकार्‍यांच्या दिमतीला ठेवण्यात आल्या आहेत. या ग्रोसरीज-ऑन-व्हील गाड्यांवर बटाटे आणि कांदेही आता विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. ही माहिती सचिवांनी दि. 4 एप्रील 2020 रोजी राज्य कार्यकारी समितीला दिली.

राज्य कार्यकारी समितीची बैठक मुख्य सचिवांच्या (पीडब्ल्यूडीचेही प्रधान सचिव) अध्यक्षतेखाली पार पडली आणि या बैठकीला विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रधान सचिव श्री. पुनीत गोयल; वाहतूक सचिव श्री एस. के. भंडारी आणि महसूल सचिव, राज्य कार्यकारी समितीचे सदस्य सचिव आणि एसडीएमए श्री संजय कुमार हे सदस्य उपस्थित होते.

त्याचप्रमाणे, वित्त सचिव श्री दौलत हवालदार, पीसीसीएफ श्री सुभाष चंद्रा; आयजीपी श्री जसपाल सिंग, मुख्य निवडणूक आयुक्त श्री कुणाल; आरोग्य सचिव श्रीमती नीला मोहनन, मत्स्योद्योग सचिव श्री. पी. एस. रेड्डी, पर्यटन सचिव श्री जे. अशोक; पंचायत सचिव श्री संजय ग्रीहर; डीआयजी श्री परमादित्य; विधी सचिव श्री सी.आर. गर्ग; नागरी पुरवठा सचिव कु. ईशा खोसला यांचीही यावेळी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थिती होती.

जिल्हा निरिक्षक आणि घटना कमांडर त्यांच्या भागातील मदत निवारा गृहांना भेट देऊन दि. 3 एप्रील 2020 रोजी राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये दिलेल्या खालील निर्देशांची अंमलबजावणी करतीलः या निवारा गृहांमध्ये राहणार्‍या मुलांना दूध आणि बिस्किटे पुरविणे, जेथे गरज असेल तेथे सेनिटरी नेपकिन्स पुरविणे, गरज असलेल्यांना फोलीक एसीड/लोह पुरवणी गोळ्या पुरविणे, मुलांची नियमित आरोग्य चिकीत्सा करणे आणि त्यांना आवश्यकतेनुसार लसीकरण दिले जाते की नाही ते पाहणे,  मुलांचे लसीकरण वेळापत्रक चुकू नये म्हणून काळजी घेणे, जिथे उपलब्ध नाही तिथे टूथब्रश, टूथपेस्ट, धुण्याचा आणि आंघोळीचा साबण, कंगवा, चटई अशा वस्तू असलेली हायजीन कीट

 

पुरवणे, आणि एखाद्या कॅम्पमध्ये कामगारांची संख्या जास्त असल्यास सुविधा कशी आहे त्याप्रमाणे अधिक निवारागृहे उभारण्याची तजवीज करणे.

औषध उद्योग जवळ जवळ सामान्य होत असल्याची माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रधान सचिवांनी दिली. औषध विक्रेत्यांचीही स्थिती पूर्वपदावर येत असल्याचे दिसते.

लॉकडाऊनच्या काळात कायद्याचे उल्लंघन करणार्‍या सुमारे 4,000 व्यक्तींवर /वाहनांवर विविध कारणांसाठी गुन्हे दाखल करण्यात आले अशी माहिती आयजीपींनी राज्य कार्यकारी समितीला दिली. समाज माध्यमांवर प्रक्षोभक भाषा वापरल्याबद्दल दोन व्यक्तींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. लॉकडाऊन उपायांची कडक अंमलबजावणी चालूच ठेवण्याचा सल्ला राज्य कार्यकारी समितीने आयजीपींना दिला.

पाणी पुरवठ्यात कोणताच तुटवडा/व्यत्यय येणार नाही यासाठी योग्य ती पावले उचलावी असे निर्देश राज्य कार्यकारी समितीने पीडब्ल्यूडी प्रधान मुख्य सचिवांना दिले. त्याचप्रमाणे बॉल वाल्वच्या खराबीमुळे ओव्हरहेड टाक्यांतील पाणी भरून वाहणार नाही याचीही काळजी घ्यावी व वितरण व्यवस्थेत काही गळती असल्यास तिच्याकडेही लक्ष देण्यास सांगितले.

साथीची स्थिती आणि लॉकडाऊन पाहता आणि गोमॅकोमधील तपासणीचे अभिकर्मक/किटस् यांची कमतरता पाहता तपासणीच्या तयारीसाठी आपत्कालीन खरेदी म्हणून जीएफआर तरतूदींना शिथील करून वेर्णा औद्योगिक वसाहतीतील मे. मोलबिओ यांच्याकडून आयसीएमआर ने मान्यताप्राप्त केलेली पाच रेपीड टेस्टींग पीसीआर यंत्रे आणि टेस्टींग कीटस् खरेदी करण्याचे अधिकार राज्य कार्यकारी समितीने आरोग्य सचिवांना दिले आहेत. ही यंत्रे म्हापसा येथील जिल्हा रूग्णालय, फोंडा येथील उप-जिल्हा रूग्णालय आणि गोमॅकोमध्ये बसवली जातील. ही यंत्रे एसएआरआय/आयएलआय प्रकरणांच्या रेपीड स्क्रीनिंगसाठीही व्यापकपणे वापरली जातील.

डीआय/एनबी/जेए/पीपी/जीडी/2020/1811

 

 

 TOP