Home »News

राज्यपालांचे "पंतप्रधान केअर " फंडा मध्ये योगदान

पणजी, एप्रिल 6, 2020

ैत्र 17, 1941

देशाला कोरोना विषाणूच्या साथीच्या विरूद्ध लढा देण्यासाठी मदत करण्याच्या हेतूने  गोव्याचे राज्यपाल श्री. सत्यपाल मलिक यांनी संपूर्ण आर्थिक वर्ष 2020 ते 21 या काळात दरमहा पगाराच्या तुलनेत एक तृतीयांश कपात करण्यचा निर्णय घेऊन तो निधी कोविड -19 सारख्या साथीच्या आजारांना सामोरे जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पंतप्रधान  केअरफंडा मध्ये जमा करून योगदान देणार आहेत.

दृढ विश्वास, अटळ सामूहिक संकल्प व दृढ निश्चयाने आम्ही एकत्र पंतप्रधानांच्या सक्षम नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली संकटावर विजय मिळवू आणि विजयी होऊ अशी आशा राज्यपालांनी व्यक्त केली

डीआय/एनबी/जेए/पीपी/जीडी/2020/1808

TOP