Home »News

प्रमाणित पोल्ट्री उत्पादनांच्या प्रवेशास सरकारची परवानगी

 

दि. एप्रिल ४,२०२०

 

            अंडी रोगमुक्त असून ती मानवी वापरासाठी योग्य असल्याचे संबंधित सरकारी खात्याच्या सक्षम प्राधिकरणाने प्रमाणपत्र दिल्यानंतरच राज्यात अंड्यांची वाहतूक करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.

          कर्नाटक व केरळ राज्यात एव्हिना इन्फ्लुएन्झा (बर्ड फ्लू) आढळून आल्यानंतर, अंड्यांसहित पोल्ट्री आणि इतर संबंधित उत्पादनांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात आणि प्रवेशावर सरकारने बंदी घातली होती.

पक्षी व पोल्ट्रीमध्ये एव्हिना इन्फ्लुएन्झा किंवा अशा इतर कोणत्याही रोगाबाबत भारत सरकारतर्फे माहिती मिळाल्यास, त्या भागातून अंडी व पोल्ट्रीची वाहतूक व प्रवेश बंद करण्यात येईल असे पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय संचालनालयातर्फे कळविण्यात आले आहे. 

 

 

TOP