Home »News

हेल्थकेअर टेलेकन्सल्टेशन सेवा सुरू

पणजी, एप्रिल 3, 2020

क्लिनिक हेल्थकेअरच्या संयुक्त विद्यमाने गोवा सरकारने वैद्यकीय प्रश्नांसाठी वैद्यकीय सल्ला घेऊ इच्छिणार्‍यां नागरिकांसाठी टेलेकन्सल्टेशन सेवा सुरू केली आहे. राज्य यावेळी कोव्हीड – 19 मुळे कठीण काळातून जात असल्याने या प्रकारची सेवा अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे.

प लॉन्च केल्यानंतर आरोग्यमंत्री श्री. विश्वजीत राणे म्हणाले की, जेव्हा संपूर्ण देश लॉकडाऊन असताना आम्ह केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचना अंमलात आणण्यास सक्षम आहोत. आरोग्य केंद्रात पोचण्यास असमर्थ असलेल्या लोकांच्या  दारापर्यंत आम्हाला वैद्यकीय मदत पोचविणे गरजेचे आहे. वैद्यकीय आरोग्याकडे आणि आरोग्य परिभाषित करण्याच्या दिशेने उचलेले हे एक पाऊल आहे. या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांच्या वतीने याचा सर्व खर्च सरकार उचलेल असेही ते पुढे म्हणाले.

श्री. राणे यांनी नागरिकांनी 91- 6366449060 हा क्रमांक जपून ठेवून वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी याचा पूरेपूर उपयोग करावा असे आवाहन केले.

क्लिनिक हेल्थकेअरचे सह-संस्थापक डॉ. सूरज बालिगा म्हणाले की क्लिनिक हेल्थकेअरला गोवा सरकार सोबत काम करण्यात आनंद होत असून गोव्यातील जनतेला दर्जेदार वैद्यकीय सेवा 24x7 उपल्बध व्हावी यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

टेलेकन्सल्टेशनद्वारे प्रत्येक रूग्णाला त्याच्या समस्येनुसार तपशीलवार सल्ला मोफत दिला जाईल. यासाठी तज्ज्ञ व सहायक 24x7 उपलब्ध असतील. रूग्णांच्या समस्यांवर सल्ला देऊन गरज असल्यास पुढील चाचण्या, औषधे किंवा जीवनशैलीत आवश्यक ते बदल सुचविले जातील. उपचाराचे प्रिस्क्रीप्शन वॉटसप किंवा एसएमएसने पाठविले जाईल, रूग्णांच्या सोयीसाठी इंग्रजी, हिंदी आणि कोंकणी या तिन्ही भाषांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे.TOP