Home »News

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संगणक आधारित ऑनलाईन मॉक टेस्ट

 

पणजी, एप्रिल 2, 2020

चैत्र 13, 1942

 

शिक्षण संचालनालय आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण मंडळ (एससीईआरटी), पर्वरी यांच्यातर्फे जिओ एम्बाईब प्रा. लि. यांच्या सहयोगानेएप्रिल 2020 मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा देणार्‍या सरकारी व सरकारी अनुदानित माध्यमिक विद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी गणित व विज्ञान विषयांसाठी संगणक आधारित ऑनलाईन मॉक टेस्ट (Computer based Online Mock Test) घेण्यात येणार आहे.

जिओ एम्बाईब टीमतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खास सातत्यपूर्ण शिक्षणाचे नियोजन करण्यात आले असून, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत असतानाच त्यांच्या शिक्षण प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आपल्या घरात बसूनच विद्यार्थी या काळात आपला अभ्यास करू शकतात आणि ही सोय मोफत उपलब्ध आहे.

विद्यार्थीhttps://www.embibe.com/mock-test/cbse/10th-cbse-mocktestही लिंक वापरून ऑनलाईन परीक्षा देऊ शकतात.

तसेच, www.liveshaala.comया संकेतस्थळावर 4 एप्रिल 2020 पासून विषयानुसार ऑनलाईन वर्ग असतील. यासाठी विद्यार्थ्यांनी झूम ऍप डाऊनलोड करावे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी वरील सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

डीआय/एनबी/जेए/एपी/एसएस/एसएसजी/2020

TOP