आयुष मंत्रालयाकडून सतर्क राहण्याचे आवाहन
पणजी, १ एप्रिल २०२०
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-१९ च्या उपचारांबद्दल पुरावे-समर्थन न देता मोठे दावे रोखण्यास मदत करण्यास सांगितले आहे. आयुष मंत्रालयाने अशा दाव्यांवर आळा घालण्यासाठी जनजागृती करण्याचे पाऊल उचलले आहे आणि पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून ही विश्वमारी पसरण्यापासून प्रतिबंधीत करण्यासाठी आयुषच्या प्रणालीमधून उपायांवर आधारीत वैज्ञानिक पुराव्यांची क्रिया सुरु केली आहे ज्याचे एक चॅनल तयार करून त्यावर आयुषच्या व्यवसायीकांकडून आणि आयुषच्या संस्थांकडून विविध सल्ले आणि प्रस्तावांची नोंद करण्यात येईल आणि अनेक वैज्ञानिकांच्या गटाव्दारे त्याच्या व्यवहार्यतेसाठी त्याची तपासणी केली जाईल. खोट्या आणि असमर्थित दाव्यांना थांबविण्यासाठी आयुष व्यवसायींपर्यंत पोहोचण्यासाठी मंत्रालय विडीयो कॉन्फरन्सिंग आणि प्रसार माध्यमांचा वापर करत आहेत. दि. ३० मार्च २०२० रोजी झालेल्या विडीयो कॉन्फरन्सिंगमध्ये आयुष मधल्या विविध विषयांवरील शंभर विचारवंतांनी भाग घेतला आणि अशा अनुचित दाव्यांविरुध्द जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी काम करण्याचा संकल्प केला. दि. ३० मार्च २०२० रोजी झालेल्या विडीयो कॉन्फरन्सिंगमध्ये रेल्वे आणि वाणिज्य मंत्री श्री. पीयुष गोयल आणि श्री. श्रीपाद नाईक एसओएस ()आयुष, यांनी आयुष इंडस्ट्रीच्या विचारवंतांना संबोधित केले.
आयुष मंत्रालयाने पंतप्रधानाच्या सांगण्यानुसार आयुष प्रणालीमधून उपायांच्या आधारावर वैज्ञानिक पुराव्यांचे काम सुरु केले आहे ज्यात त्यांना वैज्ञानिक स्पष्टीकरणांच्या आणि कोविड-१९ पसरण्यावर संयम किंवा त्या रोगाचे व्यवस्थापन करण्यात मानक वैज्ञानिक मार्गदर्शक तत्वांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या प्रस्तावांच्या आधारे सल्ले मिळविण्यासाठी आपल्या संकेतस्थळावर ऑनलाईन चॅनल तयार करायचा आहे. त्यानुसार मंत्रालयाने आयुष व्यवसायी आणि आयुष संस्थांकडून ( महाविद्यालय/ विद्यापीठ, हॉस्पिटल, संशोधन संस्था, आयुष निर्माते, आयुष असोसिएशन्स, इत्यादीं सारख्या संस्थांचा समावेश असू शकतो) मजकूर मागविला आहे. मंत्रालयाच्या संकेतस्थळावर http://ayush.gov.in/covid-19या लिंकवर आपला मजकूर सादर करावा.